Sunday, June 21, 2026
spot_img
Home रत्नागिरी दाभोळेतील तरुणाची साताऱ्यात आत्महत्या

दाभोळेतील तरुणाची साताऱ्यात आत्महत्या

संगमेश्वर:- दाभोळे गावातील तरुणाने साताऱ्यात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना दि. १४ रोजी दुपारी दोनच्या सुमारास उघडकीस आली. सुरज सखाराम सुबारे (वय २९) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सूरज सुबारे हा साताऱ्यात काम करत होता. गेल्या काही महिन्यांपासून तो साताऱ्यातील चिमणपुरा पेठेत वास्तव्यास होता. दि. १४ रोजी त्याने चिमणपुरा पेठेतील राहत्या घरात साडीच्या तुकड्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

हा प्रकार काही नागरिकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्याला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. त्याने कोणत्या कारणातून हे टोकाचे पाऊल उचलले, हे अद्याप समोर आले नाही. शाहूपुरी पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून, हवालदार दादा राजगे हे अधिक तपास करीत आहेत.