Friday, May 15, 2026
spot_img
Home गुन्हेगारी बनावट कागदपत्रांच्या आधारे ७० लाखांच्या मोटारींची विक्री; रत्नागिरीतील दोघांना बेड्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे ७० लाखांच्या मोटारींची विक्री; रत्नागिरीतील दोघांना बेड्या

रत्नागिरी:- बनावट कागदपत्रे बनवून ७० लाखांच्या मोटारी परस्पर विकणाऱ्या दोघांना शाहूपुरी पोलिसांनी अटक केली. नीलेश रामचंद्र सुर्वे (वय ३३, रा. खेडीं, शिवाजीनगर, चिपळूण) व हसन मगदूम जहागीरदार (३१, रा. कारवांचीवाडी, रत्नागिरी) अशी त्यांची नावे आहेत. याबाबत सागर हरी देसाई (३८, रा. टेंबलाईवाडी) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.

अधिक माहिती अशी, सागर देसाई कमिशनबेसवर मोटारींची विक्री करतात. त्यांच्याकडील चार आलिशान मोटारींची विक्री करण्यासाठी संजय हवालदार (कळंबा), नीलेश सुर्वे, हसन मगदूम यांच्याकडे दिल्या होत्या.

या बदल्यात त्यांना २ लाखांचे कमिशनही देण्याचे हवालदार व इतरांनी कबूल केले होते. एप्रिल २०२४ ते मे २०२४ कालावधीत या मोटारी घेऊनही संशयितांनी फिर्यादीला कोणताही मोबदला दिला नाही. बनावट कागदपत्रे तयार करून चारही मोटारींचा परस्पर महंमद हाजी (छत्रपती संभाजीनगर) व मनिष फुके (रा. नागपूर) यांना विक्री केली होती.

हा प्रकार लक्षात आल्याने सागर देसाई यांनी ७० लाखांची फसवणूक झाल्याचा गुन्हा २२ मे २०२५ रोजी दाखल केला. पोलिस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक आकाश जाधव यांच्या पथकाने रत्नागिरीचा दोन एजंटाना अटक केली.