Saturday, May 16, 2026
spot_img
Home गुन्हेगारी रेल्वे प्रवासादरम्यान मोबाईल लांबवणार्‍या विरोधात गुन्हा

रेल्वे प्रवासादरम्यान मोबाईल लांबवणार्‍या विरोधात गुन्हा

रत्नागिरी:- रेल्वे प्रवासादरम्यान मोबाईल लांबवणार्‍या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवार 17 जून रोजी रात्री 8.50 ते 10.50 वा. कालावधीत कणकवली ते रत्नागिरी रेल्वेस्टेशन दरम्यान घडली आहे.

याबाबत बजरंग भगवानराम लेगा (24, रा.नागौर, राजस्थान) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, बजरंग लेगा हे 17 जून रोजी रात्री कोकण कन्या एक्सप्रेसने प्रवास करत होते. प्रवासादरम्यान ते मोबाईल पॅन्टच्या खिशात ठेउून झापले असता अज्ञाताने त्यांच्या झोपेचा फायदा उठवत मोबाईल चोरुन नेला.