चिपळूण:- संभाव्य दुर्घटना व जीवितहानी टाळण्यासाठी कराड चिपळूण मार्गावर दि २७ जुनपर्यंत अवजड वाहनांची वाहतूक बंदच राहणार आहे. केवळ हलक्या वाहनांची वाहतूक सुरु आहे. अवजड वाहतुकीसाठी मार्गामध्ये बदल करण्यात आला असून वाहनचालकांनी नोंद घेऊन प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी केले.
गुहागर-विजयपुर राष्ट्रीय महामार्ग क्र.१६६ ई वर रुंदीकरणाचे काम सुरू आहे. दरम्यानच, सहा दिवसापूर्वी १६ जूनला जोरदार पावसात या मार्गावरील पर्यायी रस्ताच वाहून गेला होता. यानंतर मुख्य रस्त्यावर तात्पुरती दुरुस्ती करून १७ जुन रोजी हलक्या वाहनांना खुला करण्यात आला होता. या रस्त्याचे काम पूर्ण होण्यासाठी २७ जुन पर्यंत कालावधी लागणार आहे. या मार्गावरील वाहतूक ज्या ठिकाणावरुन वळविण्यात आली आहे अशा सर्वठिकाणी दिशादर्शक फलक व त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला आहे.
वाहतूक मार्गातील बदल
कराड, उंब्रजकडून चिपळूणकडे जाणारी अवजड वाहतूक
कराड व उंब्रज येथून सरळ राष्ट्रीय महामार्ग क्र.चारवरुन पाचवड फाटा उंडाळे – कोकरुड मलकापुर आंबा घाट संगमेश्वर वरुन चिपळूणकडे जाईल.
चिपळूणकडून कराड, उंब्रजकडे येणारी अवजड वाहतूक :
चिपळूण वरुन संगमेश्वर आंबा घाट, मलकापुर, कोकरुड, उंडाळे, पाचवड फाटा राष्ट्रीय महामार्ग क्र.चारवरुन कराड, उंब्रज कडे जाईल.









