Saturday, September 26, 2026
spot_img
Home गुन्हेगारी निकृष्ट दर्जाची बियाणी विक्री प्रकरणी चार दुकानदारांवर कारवाई

निकृष्ट दर्जाची बियाणी विक्री प्रकरणी चार दुकानदारांवर कारवाई

रत्नागिरी:- जिल्ह्यातील काही दुकानदार
शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाची बियाणे विक्री करत नसल्यामुळे कृषी विभागाच्यावतीने कारवाईचा बडगा उचलण्यास सुरवात केली आहे. जिल्ह्यातील तब्बल 4 दुकानांना 1 लाख 12 हजार 64 रपये किमतीच्या बियाणे विक्री करण्यास बंदी घातली आहे. 716 किलो बियाण्यांची विक्री थांबवण्यात आली आहे. त्यामुळे बियाणे, खते विक्री दुकानदारांचे धाबे दणाणले आहेत.

रत्नागिरीत मान्सून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे कोकणातील शेतकर्‍यांनी भात, नाचणीच्या शेतीसाठी नागरणी, पेरणीची लगबग सुरू केली आहे. दरम्यान, शेतकर्‍यांना चांगल्या दर्जाचे बियाणे, खत मिळावे म्हणून कृषी विभागाने बैठक घेवून सूचना ही देण्यात आल्या होत्या. चांगल्या दर्जाच्या बियाण्याची विक्री होत नसल्यास तालुका तक्रार निवारण समिती, जिल्हा स्ततरावरील हेल्पलाईनवर नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले होते.

दरम्यान, खरीप हंगामच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने जिल्ह्यातील तब्बल 40 हुन अधिक दुकानांची तपासणी केली. यामध्ये आक्षेपार्ह असे काही सापडले नाही. त्यामुळे कोणत्याही दुकानांवर कारवाई झाली नाही. तर जिल्हा अधिक्षक कृषी विभागातर्फे तालुका, शहरातील खते, बियाण्यांच्या दुकानांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 4 दुकानदारांनी नियमांचे पालन न केल्यामुळे 4 दुकानादारांवर बियाणे विक्री करण्यास बंदी आदेश देण्यात आले आहेत.