Saturday, May 30, 2026
spot_img
Home रत्नागिरी राजापुरात भरदिवसा बिबट्याची दुचाकीवर झडप, महिला जखमी

राजापुरात भरदिवसा बिबट्याची दुचाकीवर झडप, महिला जखमी

पाचल:- तालुक्यातील ओणी येथे आज सकाळी 9 वाजता भर दिवसा बिबट्याने दुचाकीवर हल्ला करून महिलेला जखमी केले. या घटनेने परिसरात भीती निर्माण झाली आहे.

सविस्तर वृत्त असे की, मनसूर अकबर मापारी (रा, ओझर) हे सकाळी 9 वाजता त्यांची पत्नी व मुलगा यांना दुचाकी वरुन राजापूर येथे घेऊन जात असताना मौजे तिवरे या ठिकाणी आले असता बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्यात दुचाकीवरून सारेच खाली पडले. त्यांची पत्नी श्रीम.अमिना मनसुर मापारी यांच्यावर बिबट्याने झडप घातली. त्यांनी आरडा ओरडा सुरू केला. मात्र अमिना यांच्या उजव्या पायात बिबट्याचे नख घुसले. त्या जखमी झाल्या. त्यांना तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र ओणी येथे उपचार दाखल करण्यात आले. त्यांची तब्येत स्थिर असल्याची माहिती वनविभागाने दिली आहे.

याबतची माहिती वन अधिकारी यांना समजताच त्यांनी जागेवर धाव घेऊन त्यांची विचारपूस करुन त्यांचे जबाब नोंदविले. घटनास्थळी जाऊन वनपाल राजापूर जयराम बावदाणे,वनरक्षक राजापूर श्री. विक्रम कुंभार,श्री.नितेश गुरव यांनी पाहणी केली आहे.