Friday, November 13, 2026
spot_img
Home रत्नागिरी हातखंबा डांगेवाडी येथील तरुणाचा आकस्मिक मृत्यू

हातखंबा डांगेवाडी येथील तरुणाचा आकस्मिक मृत्यू

रत्नागिरी:- तालुक्यातील हातखंबा डांगेवाडी येथील ४० वर्षीय राजेंद्र रामचंद्र डांगे यांचा रत्नागिरीतील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला. ११ नोव्हेंबर रोजी रात्री ही घटना घडली. या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राजेंद्र डांगे यांना दारूचे व्यसन होते. ११ नोव्हेंबर रोजी ते घरी असताना त्यांना अचानक उलट्यांचा त्रास सुरू झाला. त्यांची प्रकृती बिघडल्याने आई सीता डांगे यांनी त्यांना प्रथम हातखंबा येथील डॉ. भोसले यांच्याकडे उपचारासाठी नेले. मात्र, अधिक उपचारांची आवश्यकता असल्याने त्यांना रत्नागिरीतील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान ११ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजून ५८ मिनिटांनी डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी १२ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री १२ वाजून १० मिनिटांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. या प्रकरणी बीएनएसएस कलम १९४ अन्वये नोंद करण्यात आली असून पुढील कार्यवाही रत्नागिरी ग्रामीण पोलीस करत आहेत.