दापोली:- बस स्थानकात वृद्ध महिलेच्या पायावरून एसटीचे चाक गेल्याने महिला जखमी झाल्याची घटना दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेनंतर प्रवाशास स्थानिकांनी स्थानकात हंगामा केला.
दापोली बस स्थानकातून चालक बस घेत असताना असताना वृद्ध महिला गाडी जवळ येऊन कोणती गाडी लागली आहे. हे विचारण्याकरिता जवळ आली असता गाडीच्या पुढील भागाला धक्का लागून महिलेच्या पुढील पायावरून एसटीचे चाक गेल्याने ती गंभीर झाली. या घटनेनंतर बस स्थानकात गर्दी झाली. प्रवाशांनी आणि इतर नागरिकांनी हंगामा केल्याने बस रोखून धरण्यात आली. या घटनेची माहिती लगेच पोलिसांना देण्यात आली. यावेळी पोलिसांनी एस. टी चालकाला ताब्यात घेतले. जखमी महिलेला पायाला दुखापत झाली असून दापोली उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. पुढील तपास दापोली पोलीस करीत आहेत. पंचनामा करण्याचे काम चालू असून गाडी चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.