Monday, June 8, 2026
spot_img
Home रत्नागिरी शिरगाव-गांजुर्डा येथील वृद्धाचा आकस्मिक मृत्यू

शिरगाव-गांजुर्डा येथील वृद्धाचा आकस्मिक मृत्यू

रत्नागिरी:- शिरगाव-गांजुर्डा येथील वृद्धाच्या छातीत व श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असताना तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. रमेश रघुनाथ शेट्ये (वय ७०, रा. गांजुर्डा-शिरगाव, रत्नागिरी) असे मृत वृद्धाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. ५) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार रमेश शेट्ये हे घरी असताना त्यांना छातीत दुखून श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला. नातेवाईकांनी तात्काळ उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरु असताना तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.