भाट्ये बीच येथे मारहाण प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

रत्नागिरी:- भाट्ये बीच येथे झालेल्या मारहाणीनंतर ३१ मे रोजी संशयित चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून शहर पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फाहीस जमीर होडेकर (२७) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित आरोपी हर्ष हुसेन नागोरे, आयान गनी मुल्ला, रिहान दिलावर शेख, अफान हुसेन नागोरे यांनी फिर्यादीचा भाऊ समाक होडेकर याला लाकडी – हॉकी स्टीकने शुक्रवार दि. ३० मे रोजी सायंकाळी मारहाण केली. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात संशयित आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ चे कलम ११८ (१), ११५ (२), ३५२, ३५१ (२), ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलीस करीत आहेत.