गुहागरमध्ये दुचाकी अपघातात महिलेचा मृत्यू

गुहागर:- तालुक्यातील चिखली येथे मोटारसायकलवरून पडून झालेल्या अपघातात समीक्षा सजित माळी (वय ३८, रा. कर्तब पिपरवाडी, ता. गुहागर) या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. १५ मे रोजी दुपारी ३ वाजता हा अपघात घडला.

अपघातानंतर त्यांना तातडीने डेरवण येथील वालावलकर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या प्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यात १९ मे २०२५ रोजी दुपारी ४.२४ वाजता आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.