मारुती मंदिर येथे मद्यपान करणाऱ्या दोन तरुणांविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या दोन तरुणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तन्मय गुरुनाथ सावंत (वय २९) व कय्युम मुबारक खान (वय २६) अशी संशयित तरुणाचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. १८) रात्री साडेआठच्या सुमारास मारुती मंदिर हिंदुकॉलनी समोरील छ. शिवाजी स्टेडियम बाजूला आडोशाला निदर्शनास आली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित तरुण हे शिवाजी स्टेडियम च्या बाजूला आडोशाला मद्यपान करत असताना निदर्शनास आले. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल भालचंद्र मयेकर व अनुप पाटील यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.