एसटी स्टॅंडसमोर गैरसमजातून मारहाण; संशयिताविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- भांडण सुरु असताना आपल्याशी भांडण करण्यासाठी आलेले आहेत असा गैरसमज करुन प्रौढाच्या छातीवर सिमेंट ब्लॉक मारुन दुखापत केल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओंकार इंदुलकर (पुर्ण नाव पत्ता माहित नाही) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. १७) रात्री अकराच्या सुमारास शहरातील जयस्तंभ येथील एसटी स्टॅंडसमोर घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी सचिन पाडूरंग वायंगणकर (वय ४९) हे प्रेशरच्या गोळ्या आणण्यासाठी रत्नागिरी एसटी स्टॅंडसमोर येथे गेले असता. तेथे अगोदरच ओंकार इंदुलकर, पिंटू महाराणा व एक महिला असे एकमेंकामध्ये आपापसात भांडण करत होते. ते भांडण फिर्यादी यांचे वाडीतील विनय मसुरकर पहात उभे होते. म्हणून फिर्यादी यांनी विनय मसूरकर याला भांडण करत असलेले कोण आहेत. तुझ्या ओळखीचे आहेत का अशी विचारणा केली असता भांडण असलेला संशयित ओंकार इंदुलकर यास वाटले की, फिर्यादी सचिन वायंगणकर हे संशयित यांच्याशी भांडण करण्यास आलेले आहेत. असा समज करुन घेऊन संशयित इंदुलकर याने स्त्याच्या बाजूला असलेल्या अर्धवट तुटलेल्या सिमंट ब्लॉक दगड उचलून फिर्यादी यांच्या छातीवर मारुन दुखापत केली. या प्रकरणी फिर्यादी सचिन वायंगणकर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अमंलदार करत आहेत.