Sunday, May 17, 2026
spot_img
Home रत्नागिरी चाफेरी येथे मानवी सांगाडा आढळल्याने खळबळ

चाफेरी येथे मानवी सांगाडा आढळल्याने खळबळ

रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील चाफेरी गावात शनिवारी (दि. १७ मे) सकाळी एका घराशेजारील रस्त्यालगत मानवी सांगाडा आढळल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेची नोंद जयगड पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. सांगाड्याची वैद्यकीय तपासणी केल्यानंतरच त्याबाबत अधिक माहिती समोर येणार आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळच्या सुमारास चाफेरी येथील एका नागरिकाला त्याच्या घराशेजारील रस्त्यालगत मानवी कवटी दिसली. ही बाब त्याने तातडीने जयगड पोलिसांना कळवली. माहिती मिळताच पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिसराची पाहणी केली असता, तेथे एक संपूर्ण मानवी सांगाडा आढळून आला. पोलिसांनी सांगाडा ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी पाठवला आहे. हा सांगाडा स्त्रीचा आहे की पुरुषाचा, याबाबत वैद्यकीय तपासणीनंतरच स्पष्टता येणार आहे. सध्या जयगड पोलिस अमलदार या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.