Saturday, May 23, 2026
spot_img
Home लांजा स्विफ्ट कार- रिक्षा अपघातात चौघे जखमी

स्विफ्ट कार- रिक्षा अपघातात चौघे जखमी

लांजा:- भरधाव वेगाने जाणाऱ्या स्विफ्ट कारने रिक्षाला धडक दिल्याने रिक्षातील चार जण जखमी झाले. हा अपघात गुरुवारी १५ मे रोजी सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास दाभोळे वाटुळ मार्गावर शिपोशी सरकारी दूध डेअरी या ठिकाणी घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लांजा तालुक्यातील प्रभानवल्ली शिंदेवाडी येथील रिक्षा व्यावसायिक उमेश नामदेव शिंदे (वय ३७) हे आज गुरुवारी सकाळी लांजा दाभोळे वाटूळ मार्गावर दाभोळे येथून प्रभानवल्लीकडे रिक्षा घेऊन जात असताना कुडाळहून दाभोळेच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या स्विफ्ट कार क्रमांक (एम. एच.०७ एएस ०६४३ ने राँग साइडला जावुन रिक्षाला जोरदार धडक दिली.

या अपघातात रिक्षा (क्रमांक एम एच ०५ इ एक्स ५१८६) चे चालक उमेश शिंदे यांच्यासह रुपेश नामदेव शिंदे, वैभव विश्वनाथ शिंदे, आदेश खोत असे चौघेजण जखमी झाले. तर रिक्षाचे देखील मोठे नुकसान झाले आहे. ही स्विफ्ट कार पर्शुराम राजेंद्र तिरोडकर (वय ३२ राहणार कुडाळेश्वर मंदिराजवळ कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग) हे चालवत होते.

आपल्या ताब्यातील स्विफ्ट कार निष्काळजीपणे भरधाव वेगाने चालवून रिक्शाला धडक देत तिचे नुकसान केले तसेच चौघांना जखमी केल्याप्रकरणी लांजा पोलिसांनी स्विफ्ट कारचालक पर्शुराम तिरोडकर यांच्यावर भारतीय न्याय संहिता २०२३ ची कलम २८१, १२५ (अ), १२५ (ब), मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सचिन भुजबळराव हे करत आहेत.