प्रेमसंबंधातून बाळाची हत्या; संशयितेला ५ वर्षांनी जामीन

रत्नागिरी:- प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाची हत्या केल्याचा आरोप असलेल्या मातेला सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. तिच्याविरुद्ध २२ डिसेंबर २०१९ रोजी जयगड पोलिसांनी गुन्हा दाखल करत अटक केली होती. ५ वर्षानंतर २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर मुक्तता करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

न्यायालयाने तिला सशर्त जामीन मंजूर केला आहे. खटल्याच्या तारखेवेळी न्यायालयात हजर राहणे व प्रत्येक महिन्याच्या १ व १५ तारखेला जयगड पोलिसात हजेरी लावण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. रत्नागिरी सत्र न्यायाधीश सुनील गोसावी यांनी जामीन अर्जावर निर्णय दिला.