रत्नागिरी:- पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ ऑपरेशन सिंदूर राबविण्यात आले. या मोहिमेसाठी देशातील सैन्याच्या उत्कृष्ट कामगिरीच्या सन्मानार्थ १७ मे रोजी सायंकाळी ५.३० वाजता मारुती मंदिर ते जयस्तंभ मार्गावर तिरंगा रॅली काढण्यात येणार आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या रॅलीच्या नियोजनासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज बैठक झाली. बैठकीला अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, माजी नगराध्यक्ष राहुल पंडित, बंड्या साळवी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन या रॅलीचा प्रारंभ होणार आहे.









