Wednesday, May 27, 2026
spot_img
Home रत्नागिरी रोजगार निर्मितीत रत्नागिरी जिल्हा राज्यात अव्वल

रोजगार निर्मितीत रत्नागिरी जिल्हा राज्यात अव्वल

१३० टक्के रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट पूर्ण

रत्नागिरी:- मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत रत्नागिरी जिल्ल्याने यावेळी भक्कम कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे उदिष्टापेक्षा अधिक झेप घेत जिल्हा अव्वल ठरला आहे. २०२५-२६ या आर्थिक वर्षात ७८० प्रकरणांचे उद्दिष्ट असताना जिल्हयाने तब्बल १३०.६४ टक्के यश संपादन करत राज्यात अव्वल स्थान गाठले आहे.

या योजने अंतर्गत जिल्हा उद्योग केंद्राकडे आलेल्या २ हजार ६९२ अजपैिकी २ हजार २४६ अर्ज पात्र ठरले. त्यातून १०१९ नवउद्योजकांना कर्ज मंजुरी मिळाली असून अनेक तरुण- तरुणींना स्वतःचा उद्योग सुरू करण्याचा मार्ग मोकळा अनुदान वितरण आणि मार्जिन मनी क्लेम झाला आहे. विशेष म्हणजे प्रक्रियेतही जिल्हा राज्यात आघाडीवर राहिला आहे. या यशामागे जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांची सातत्यपूर्ण पाठपुरावा व नियोजन महत्त्वाचे ठरले. याशिवाय विजू शिरसाट आणि दर्शन कानसे यांचेही सहकार्य लाभले, अशी माहिती अजिक्य आजगेकर यांनी दिली.

योजनेच्या यशात बँकांचा सिंहाचा वाटा राहिला. बैंक ऑफ इंडियाने ३१७, बैंक ऑफ महाराष्ट्रने १४७, स्टेट बँक ऑफ इंडियाने ९४, कोटक महिंद्रा बँकेने ८५, महाराष्ट्र ग्रामीण बँकेने ६१ आणि युनियन बँकेने ५३ कर्ज प्रकरणे मंजूर करुन उद्दिष्टपूर्तीत महत्त्वाची भूमिका बजावली. इतर बँकांनीही सक्रिय सहभाग नोंदवला,

उद्योजक घडवण्यासाठी मिटकॉन आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी) यांनी प्रशिक्षण दिले, तसेच उमेद (एमएसआरएलएम) व माविमच्या माध्यमातून रोजगार मेळावे घेऊन बचतगटांना योजनेचा लाभ देण्यात आला. जिल्हाधिकारी मनुज जिदल यांनी सर्व बँकांचे अभिनंदन करत, भविष्यातही रत्नागिरी जिल्हा रोजगारनिर्मितीत अग्रस्थानी राहावा, असे आवाहन केले. तसेच अजिंक्य आजगेकर यांनी सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना या योजनांचा लाभ घेऊन स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन केले.

एकूणच, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमामुळे रत्नागिरी जिल्ह्यात स्वरोजगाराची नवी लाट निर्माण होत असून, जिल्हा विकासाच्या नव्या उंचीवर पोहोचत असल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.