गणपती स्पेशल ट्रेनला चाकरमान्यांचा थंडा प्रतिसाद

रत्नागिरी रेल्वे स्थानकात आलेल्या पहिल्या गणपती स्पेशल ट्रेनने अवघे 11 चाकरमानी दाखल

रत्नागिरी:- गणेशोत्सवानिमित्त कोकणात येणा-या चाकरमान्यांसाठी विशेष ट्रेन सोडण्यात आल्या आहेत, मात्र चाकरमान्यांचा या ट्रेनना थंडा प्रतिसाद मिळत असल्याचं पहायला मिळत आहे. 

गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर विशेष ट्रेन सोडण्यात येत आहेत. जवळपास 187 फेऱ्या ट्रेनच्या सोडण्यात येणार आहेत. शनिवारी रात्री लोकमान्य टिळक टर्मिनस ते रत्नागिरीसाठी सुटलेली पहिली गणपती स्पेशल ट्रेन आज (रविवार) पहाटे रत्नागिरी रेल्वे स्थानकात दाखल झाली, वेळेआधीच जवळपास अर्धा ते पाऊण तास अगोदर ही ट्रेन रत्नागिरी रेल्वे स्थानकात दाखल झाली, मात्र अवघे 11 चाकरमानी या ट्रेनने रत्नागिरी रेल्वे स्थानकात उतरले. त्यामुळे अतिशय अल्प प्रतिसाद या ट्रेनला मिळाल्याचं पहायला मिळालं.  तर दुसऱ्या ट्रेननेही अवघे 16 प्रवासी रत्नागिरी रेल्वे स्थानकात उतरले.. रत्नागिरी रेल्वे स्टेशनवर आलेली दुसरी ट्रेन म्हणजेच सीएसएमटी- सावंतवाडी ही  ट्रेन सावंतवाडीकडे रवाना झाली. मात्र सावंतवाडीकडे रवाना होताना सुद्दा रेल्वेचे अनेक डब्बे रिकामे पहायला मिळाले.