सोलर पॅनेलच्या बॅटऱ्यांची चोरी

राजापूर:- तालुक्यातील चुनाकोळवण ग्रामपंचायत हद्दीत अज्ञाताने ग्रामपंचायतीने बसवलेल्या ३ सोलर पॅनेलच्या बॅटऱ्यांची चोरी केली आहे. जवळपास ३० हजार रुपये त्यांची किंमत असल्याची नोंद पोलीस ठाण्यात देण्यात आलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

चुनाकोळवणचे ग्रामसेवक विलास गणपत सोबल यांनी शुक्रवारी राजापूर पोलीस ठाण्यामध्ये त्याबाबत तक्रार नोंद केली होती. चुनाकोळवण येथील सवतकडा, परिस कडा, आणि होळीचा मांड येथे सौर पथदीप बसवण्यात आले होते. त्यात तीनही सौर पथदीपाच्या बॅटऱ्या चोरट्यांनी चोरी केली आहे. राजापूर पोलीस ठाण्यात देण्यात आलेल्या तक्रारीत नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी राजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर उबाळे अधिक तपास करत आहेत.