रत्नागिरीत मद्यपान करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- तालुक्यातील कोतवडे-सनगरेवाडी आणि एमआयडीसी चंपक मैदान येथील सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या दोघांविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंद्रकांत शंकर पिलणकर (वय ५४, रा. सनगरेवाडी, कोतवडे, रत्नागिरी) व राहूल गुलाब तिवारी (वय ३३, रा. एमआयडीसी-मिरजोळे, रत्नागिरी) अशी संशयितांची नावे आहेत. या घटना गुरुवारी (ता. १७) दुपारी चार ते सायंकाळी साडेसहाच्या सुमारास कोतवडे-सनगरेवाडी व चंपक मैदान येथे निदर्शनास आली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयितांकडे मद्यपान करण्याचा परवाना नसताना मद्यपान करताना आढळून आले. या प्रकरणी पोलिस हवालदार रुपेश भिसे यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.