रत्नागिरी:- शहरातील तेली आळी येथे मद्यपान करुन आरडा-ओरडा व असभ्य वर्तन करणाऱ्या प्रौढा विरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आशिष शंकर आडविलकर (वय ५०, तेली आळी, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. १४) दुपारी अडीचच्या सुमारास तेली आळी येथे घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित आशिष आडविलकर हे सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करुन आरडा-ओरडा व असभ्य वर्तन केले. या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल बाजीराव कदम यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.