रत्नागिरी शहरात सार्वजनिक ठिकाणी मद्यधुंद व्यक्तीची हुल्लडबाजी, गुन्हा दाखल

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या समोरील रोडवर एका व्यक्तीने सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करून गोंधळ घातल्याची घटना १० एप्रिल २०२५ रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नंदकुमार राजाराम गुरव (वय ४२, रा. मेवी गरववाडी, रत्नागिरी) हा प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या समोरील रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी मद्यधुंद अवस्थेत मोठ्या आवाजात आरडाओरडा करत होता आणि असभ्य वर्तन करत होता. कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल मनिषा शैलेश होरंबे यांनी त्याला ताब्यात घेतले.

याप्रकरणी मनिषा होरंबे यांच्या फिर्यादीवरून रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात आरोपी नंदकुमार गुरव याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ८५(१)(२) आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ११०/११७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.