रामपूर-तांबी धरणात तरुणाचा बूडून मृत्यू

चिपळूण:- रामपूर-तांबी धरणात गुरे धुण्यासाठी गेलेला तरुण शेतकरी बुडाल्याची घटना रविवारी दुपारी १२ वाजता घडली. प्रतिक अजय लटके (३०, मालघर) असे त्याचे नाव आहे. गुढीपाडव्या दिवशीच घडलेल्या या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, प्रतिक हा रविवारी तांबी धरणात नेहमीप्रमाणे गुरे धुण्यासाठी गेला होता. यावेळी बैलाला बांधलेली रस्सी सुटल्याने त्याचा तोल गेला व तो पाण्यात बुडाला. याची माहिती मिळताच ग्रामस्थांनी येथे धाव घेतली. त्यानंतर पोलीसही दाखल झाले. त्याचा धरणात शोध घेण्यासाठी नगर परिषदेकडे बोट मागण्यात आली. त्यानुसार मुख्याधिकारी विशाल भोसले, प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर यांनी बोट चालक शौकत गोलंदाज, नगर परिषदेचे कर्मचारी जयंत कासार आदींमा यंत्रणा घेऊन पाठवले. त्यानुसार शोध घेण्यात आला असता सायंकाळी प्रतिक याचा मृतदेह सापडला. याची पोलीस ठाणेत नोंद करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.