Thursday, May 21, 2026
spot_img
Home चिपळूण आजारपणाला कंटाळून महिलेची आत्महत्या

आजारपणाला कंटाळून महिलेची आत्महत्या

असर्डे साळवीवाडी येथील धक्कादायक घटना

चिपळूण:- चिपळूण तालुक्यातील असर्डे साळवीवाडी येथे एका ४९ वर्षीय महिलेने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. दीर्घकाळापासून असलेल्या आजारपणाला कंटाळून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

मयत सौ. शर्वरी संतोष साळवी (वय ४९, रा. असर्डे साळवीवाडी, ता. चिपळूण) या गेल्या काही काळापासून कॅन्सर (कर्करोग) या गंभीर आजाराने त्रस्त होत्या. त्यांच्यावर सातत्याने औषधोपचार सुरू होते. मात्र, १ एप्रिल रोजी सकाळी ११ ते दुपारी २ वाजण्याच्या सुमारास, घरात कोणी नसताना त्यांनी आपल्या राहत्या घरातील बेडरूममधील लोखंडी चॅनेलला ओढणीच्या सहाय्याने गळफास लावून घेतला. काही वेळानंतर ही बाब निदर्शनास आली असता, त्यांना तातडीने वाचवण्याचा प्रयत्न झाला, परंतु त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.

​मिळालेल्या माहितीनुसार, सौ. शर्वरी साळवी या कॅन्सरच्या आजारपणामुळे शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या खचल्या होत्या. याच आजारपणाला कंटाळून त्यांनी आपले जीवन संपवल्याचे सांगितले जात आहे. या घटनेमुळे असर्डे साळवीवाडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

​या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. चिपळूण पोलीस ठाण्यात याप्रकरणी १ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.