सार्वजनिक ठिकाणी मद्यपान ; दोघांविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- तालुक्यातील जयगड ते गणपतीपुळे जाणाऱ्या रस्त्यावर उंडी फाट्याजवळ झाडाखाली व मालुगुंड येथील आदर्श शाळेच्या समोरिल रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन करणाऱ्या दोघांविरुद्ध जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरुण गणपत गवाणकर (वय ५६, रा. उंडी कुणबीवाडी, रत्नागिरी) व शरद अशोक मयेकर (वय ४६, रा. मालगुंड भंडारवाडा, रत्नागिरी) अशी संशयितांची नावे आहेत. या घटना गुरुवारी (ता. २७) सायंकाळी सहा ते साडेसहाच्या सुमारास उंडी फाटा व मालगुंड येथे निदर्शनास आल्या.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन करत असताना पोलिसांच्या निदर्शनास आले. या प्रकरणी पोलिस शिपाई पवन पांगरीकर व महिला पोलिस शिपाई अन्वी पुसाळकर यांनी जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.