खेड:- रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक रविवारी बिघडल्यामुळे विकेंडलाच प्रवाशांची रखडपट्टी झाली. जबलपूर-कोईमतूरला तब्बल ११ तासांचा ‘लेटमार्क’ तर गोव्याच्या दिशेने जाणारी कोकणकन्या एक्स्प्रेसही चार तास उशिराने धावली.
अन्य रेल्वेगाड्यांच्या सेवांवरही परिणाम झाला होता. शिमगोत्सवासाठी गावी आलेल्या चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासाचा ओघ सुरूच असल्याने मुंबईच्या दिशेने धावणाऱ्या नियमित गाड्या हाउसफुल्लच धावत आहेत.
शनिवारी सायंकाळी ओव्हरहेड वायरमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे मुंबईला जाणारी मांडवी एक्स्प्रेस पाच तास रखडली होती. हे वेळापत्रक सोमवारी सुरळीत झाले.









