Wednesday, May 6, 2026
spot_img
Home रत्नागिरी आठवडा बाजार येथे बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या तरुणाचा मृत्यू

आठवडा बाजार येथे बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या तरुणाचा मृत्यू

रत्नागिरी:- शहरातील आठवडा बाजार येथील बंद टपरीच्या बाजूला बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या तरुणाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. संजय रामदेव राम (वय ३७, रा. राजिवडा, रत्नागिरी) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. १४) सायंकाळी साडेसहा वाजता जिल्हा रुग्णालयात घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संजय राम हे आठवडा बाजार येथे बेशुद्ध अवस्थेत एक बंद टपरीच्या बाजूला पडले होते. त्यांना तेथील नागरिकांनी व पोलिसांनी उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी शहर पोलिस आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.