रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा परिषदेत यंदा तिसऱयांदा पदाधिकाऱयांविना सन 2025-26 चा अर्थंसंकल्प सादर करण्यात आला आहे. जिल्हा परिषदाया केवळ स्वताया उत्पन्नाााs व खर्चाचे सन 2024-25 चे अंतिम सुधारित व सन 2025-26 चे मुळ अंदाजपत्रक सादर करण्यात आले. सन 2024-25 चे अंतिम सुधारित महसुली जमा रक्कम सुमारे 20 कोटी 38 हजार एवढी वाढ घेवून सुमारे 37 कोटी 78 लाख 66 हजार महसूली खर्चाच्या अंदाजपत्रकाला प्रशासनाकडून मंजूरी देण्यात आली.
हे अंदाजपत्रक गुरूवारी 20 मार्च रोजी जिल्हा परिषदेच्या सभागृहात सादर करण्यात आले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. वैदही रानडे यांनी हे अंदाजपत्रक सादर केले. त्यावेळी अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, मुख्य व लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, ग्रामपंचायत विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह सर्व खातेप्रमुख, अधिकारी तसेच वित्त विभागांतर्गत अर्थसंकल्प शाखांतील अधिकारी उपस्थित होते.
रत्नागिरी जिल्हा परिषदेत सध्या प्रशासकीय कारभार सुरु आहे. जिल्हा परिषदेतर्फे दरवर्षी आपले स्वतचे आर्थिक बजेट सादर केले जाते. सन 2025-24 या आर्थिक वर्षासाठीचा जिल्हा परिषद स्व उत्पन्नाचा अर्थसंकल्प सादर होण्याची प्रतिक्षा सर्वांना लागली होती. पदाधिकाऱयांविना यंदाही हा अर्थसंकल्प सादर झाला आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 चे कलम 137 नुसार पुढील वर्षाचे मुळ अंदाजपत्रक हे 27 मार्च पर्यंत करणेची तरतुद आहे.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ मध्ये उपविभाग असाधारण क्रमांक 26 ग्रामविकास विभाग दिनांक 11 मार्च 2022 च्या आदेशान्वये जिल्हा परिषदांच्या सर्व अधिकारांचा वापर करण्यासाठी व त्यांची कर्तव्ये पार पाडण्यासाठीचे अधिकार, प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्रदान करणेत आलेले आहेत. त्यामुळे सर्व उपस्थित खातेप्रमुख यांनी केलेल्या शिफारशींचा विचार करुन, जिल्हा परिषदेच्या स्व उत्पन्नाचे सन 2024-25 चे अंतिम सुधारीत अंदाजपत्रक व 2025-26 चे मूळ अंदाजपत्रक सादर करण्यात आले.
जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेपुढे ग्रामिण भागातील जनतेला न्याय देण्याच्या दृष्टीकोनातुन हा अर्थसंकल्प सादर आला आहे. सन 2023-2024 या वित्तीय वर्षातील प्रत्यक्ष जमा व प्रत्यक्ष खर्चाचा विचार करता प्रत्यक्षात 1 एप्रिल 2024 रोजी आरंभीचे शिल्लक रक्कम रुपये 17,40,51,000/- एवढी राहिली आहे. सन 2024-25 ची अंतिम सुधारित महसुली जमा रक्कम रुपये 20,38,15,246/- एवढी विचारांत घेवून रक्कम रुपये 37,78,66,246/- महसूली खर्चासाठी उपलब्ध होणार आहे. तसेच सन 2025-26 चे मूळ अंदाजपत्रकात आरंभीची शिल्लक रुपये 91,827/- एवढी आहे. सन 2025-26 ची अंदाजित महसूली जमा रक्कम रुपये 19,62,62,600/- एवढी विचारात घेऊन, आरंभीचे शिल्लकेसह रक्कम रुपये 19,63,54,427/- महसूली खर्चासाठी त्तरतूद उपलब्ध केली आहे.
सन 2024-25 च्या मूळ अंदाजपत्रकापेक्षा, सन 2024-25 चे अंतिम सुधारित अंदाजपत्रक हे जास्त रक्कमेचे आहे. महाराष्ट्र शासनाच्या धोरणाप्रमाणे अंदाजपत्रक तयार करताना काही विभागाच्या योजनांसाठी वैधानिक तरतूदी मागील 100 टक्के अनुशेषासह व प्राप्त रकमेच्या, विहीत टक्केवारीच्या, विभागनिहाय तरतूदी प्रस्तावित करण्यात आलेल्या आहेत. या तरतूदी करताना रत्नागिरी जिह्याचा सर्वांगीण विकास होण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी पिठाची गिरणी, सौर कंदील, शिलाई मशीन, पिको फॉल मशीन, घरगुती फळ प्रक्रीया उद्योग उदा. काजु कटर, मिनी काजु ग्रेडर, मसाला कांडप मशीन, घरगुती मसाला उद्योग इत्यादी, महिलांच्या उपजिविकेसाठी व विकासासाठी अंदाजपत्रकात आवश्यक तरतुद उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे अंगणवाडय़ातील बालकांना शैक्षणीक बौद्धीक विकासाला चालना देणारी विविध प्रकारची खेळणी, शारिरीक विकासासाठी आवश्यक खेळाचे साहीत्य, शैक्षणिक तत्ते तसेच मुलींना सायकलींसाठी अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. रत्नागिरी जिल्हयातील ग्रामीण भागातील विदयार्थ्यांच्या गुणवत्तेचा विकास करणेसाठी व शाळांचा दर्जा उंचवण्यासाठी ज्या शाळा नादुरुस्त होत्या अशा शाळांच्या दुरुस्ती करीता अंदाजपत्रकात तरतुद करण्यात आली आहे.









