रत्नागिरी:- शहरातील कुवारबाव येथील मलुष्टे नगर येथे इमारतीच्या पार्किंगमध्ये पार्क केलेली १ लाख ४० हजार रुपयांची दुचाकी अज्ञात चोरट्याने पळविली. शहर पोलिस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी (ता. १६) सकाळी आठच्या सुमारास श्री साई बिल्डींग, शेट्ये मलुष्टेनगर, कुवारबाव येथे घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी विवेक विनायक नलावडे (वय ४३, रा. मलुष्टेनगर, कुवारबाव, रत्नागिरी) यांनी दुचाकी इमारतीच्या पार्किंगमध्ये पार्क केली होती. अज्ञात चोरट्याने ती पळविली. या प्रकरणी नलावडे यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.