दांडक्याने मारहाण करणाऱ्या तरुणावर गुन्हा

चिपळूण:- विनाकारण दुचाकीवर बसलेल्या एकाला खाली खेचत तरुणाने दांडक्याने मारहाण केल्याचा प्रकार काल (ता. २८) दुपारी दोनच्या सुमारास देवखेरकी तळ्याचीवाडी येथील रस्त्यावर घडला. याप्रकरणी चिपळूण पोलिस स्थानकात तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नृतिक राजेंद्र हळदे (वय २४) असे चिपळूण पोलिस स्थानकात गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबतची फिर्याद राजेंद्र हनुमंत मोरे (५५) यांनी पोलिसांत दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र मोरे हे त्यांचा भाचा शुभम हळदे यांच्या मोटारसायकलवर पाठीमागे बसून रामपूर येथून घरी निघाले होते. ते देवखेरकी तळ्याचीवाडी घराजवळ रस्त्यावर आल्यावर संशयित नृतिक हळदे याने काहीही कारण नसताना राजेंद्र मोरे यांना मोटारसायकलवरून खाली खेचले व हातातील दांडक्याने मारहाण केली. त्यावेळी मोरे यांची पत्नी व शेजारी राहणारी एक महिला त्यांना सोडविण्यासाठी गेल्या त्यावेळी त्यांनाही नृतिक याने शिवीगाळ व धमकी देऊन मारहाण केली. याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास चिपळूण पोलिस करीत आहेत.