दिव्यांग मुलीवर अज्ञाताकडून अत्याचार

राजापूर:- जिल्ह्यातील एका दिव्यांग मुलीवर अत्याचार झाला व ती गरोदर राहिल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अत्याचार झालेली मुलगी बावीस वर्षीय असून, दिव्यांग आहे. काही महिन्यांपूर्वी तिच्या वडिलांचे निधन झाले असून, घरात आईसह ती राहते. अत्याचारानंतर ती गरोदर राहिल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी अद्याप कुणालाही अटक झाली नसून, पोलिस उपनिरीक्षक सुधीर उबाळे अधिक तपास करत आहेत. तपासात पोलिसांनी घटनास्थळी जाऊन चौकशी केली. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक चव्हाण यांच्याकडून सांगण्यात आले.