चिपळूण:- चिपळूण-खेड एसटीवरील वाहकाला दोन तरुणांनी शिवीगाळसह मारहाण केल्याची घटना रविवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावरील वालोपे -कळंबस्ते मार्गावर घडली. या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात फिर्याद देण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरु होती.
चिपळूण-खेड ही एसटी प्रवाशांना घेऊन चिपळूणहून खेडच्या दिशेने जात होती. ही बस मुंबई-गोवा महामार्गावरील वालोपे कळंबस्ते सर्व्हिस मार्गाने पुढे नियोजित प्रवासाला जात असताना दोन तरुणांनी बसच्या वाहकाला ही एसटी सर्व्हिस रोडवर का आणली, अशी विचारणा केली. यातून वाद निर्माण झाला व त्या तरुणांनी त्या वाहकाला शिवीगाळसह मारहाण केली.
यानंतर प्रवाशांनी भरलेली ही एसटी पुन्हा चिपळूण आगारात आणण्यात आली. या झालेल्या प्रकाराची वरिष्ठांना माहिती दिल्यानंतर फिर्याद देण्यासाठी त्या एसटीचे वाहक हे एसटीसह चिपळूण पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाले. यानंतर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद देण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरु होती.