नाखरेत तरुणास मारहाण करणाऱ्यावर गुन्हा

रत्नागिरी:- तालुक्यातील नाखरे उंबरवाडी येथील संजय सुधाकर शिंदे याने तरुणास शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

यातील संशयित संजय सुधाकर शिंदे याने दारूच्या नशेत येऊन फिर्यादी अक्षय संजय शिंदे (वय २८) व फिर्यादी यांच्या आईला कोणतेही कारण नसताना शिवीगाळी करून कुदळीने मारहाण करून दुखापत केली म्हणून त्याच्याविरुद्ध भारतीय पूर्णगड सागरी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना ७ फेब्रुवारी रोजी मौजे पाखरे उबरवाडी येथे घडली.