रत्नागिरी:- राजस्थानी पोशाखतील ४ महिला सोबत मुले घेऊन अचानक घरात घुसून पैसे मागत असून मिळतील त्या वस्तू उचलून जबरदस्तीने घेऊन जात होत्या. मंगळवारी महिलानी रत्नागिरी एमआयडीसी येथील कॉनफोर्ड इंडस्ट्रीज येथे घरात घुसून मालक कल्पना भिसे यांचे कपाटातील मंगळसूत्र व अंगठी जबरदस्तीने घेऊन गेलेल्या होत्या. ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल होताच पोलीसांनी बारा तासाच्या आता संबधित महिलांना गोवा येथून अटक केली आहे.
मंगळवारी दुपारच्या सुमारास रत्नागिरी शहरानजीक असणार्या एमआयडीसी भागात दिवसाढवळ्या घडलेल्या चोरीच्या घटनेने एकच खळबळ उडाली होती . जे के फाईल्स जवळ राहणार्या कल्पना भिसे यांच्या घरात पाच ते सहा महिलांनी घुसून त्यांच्या घरातील कपाटातून सोन्याचे दागिने लंपास केले होते. मंगUवारी दुपारच्या सुमारास हि घटना घडली होती. पोलिसांकडे आलेल्या तक्रारी वरून रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी तात्काळ तपासाची सूत्र फिरवून १२ तासाच्या आत संशयित आरोपी महिलांना गोवा येथून अटक केली. पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.