चिपळूण:- कोकण रेल्वेमार्गावरील मत्स्यगंधा एक्स्प्रेसमधील एका महिला प्रवाशाची पर्स लांबवून सुमारे ९२ हजार ३०० रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री २.१० वा. येथे घडली. याप्रकरणी येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. संबंधित महिला कुडाळहून मुंबईकडे प्रवास करत होती. प्रवासात ती
झोपी गेली असताना तिची पर्स चोरीला गेली. गाडी चिपळूण रेल्वेस्टेशन येथे आली असता हा प्रकार तिच्या लक्षात आला. पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पर्समधून २५ हजार रुपये किमतीचा मोबाईल, ३ हजार ३०० रुपयांची रोख रक्कम, ३९ हजार रुपये किमतीचा मोबाईल, २२ हजार रुपये किमतीची दोन हातातील मनगटी घड्याळे, ३ हजार रुपये रोख असा ९२ हजार २०० रुपयांचा ऐवज चोरीला गेला.