रत्नागिरी:– सामायिक घराचा दरवाजा उघडल्याच्या रागातून महिलेला मारहाण करून तिला जखमी केल्याप्रकरणी सडामिऱ्या येथील दोघांविरुद्ध शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यातील तक्राद्रार साक्षी चंद्रकांत गांधी (वय-४६,रा.मारुती मंदिर) या सडामिऱ्या येथे गेल्या असता त्यानी सामायिक घराचा दरवाजा उघडला असा संशय घेऊन साक्षी व त्यांच्या आईला लोखंडी सळीने व काठीने मारहाण केली. या मारहाणीत साक्षी या जखमी झाल्या.
याप्रकरणी साक्षी गांधी यांनी शहर पोलीस स्थानकात तक्रार दिली असून या तक्रारीवरून पोलिसांनी राजेश कमलाकर सावंत व रुपेश कमलाकर सावंत यांच्याविरोधात भा.द.वि.क ३२४,५०४,५०६,३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याचा पुढीप तपास पो.ना. दिपक बावधने करीत आहेत.









