नाटे बाजारपेठ येथे मटका जुगारावर पोलिसांची कारवाई

रत्नागिरी:- नाटे बाजारपेठ (ता. राजापूर) येथे विनापरवाना मटका जुगारावर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी साहित्यासह १ हजार ९१५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. नाटे सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उमेश हरिश्चंद्र चव्हाण (वय ४८, रा. नाटे, राजापूर) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. २४) दुपारी साडेबाराच्या सुमारास नाटे बाजारपेठ येथील एका स्टॉलच्या पाठीमागील बाजूस निदर्शनास आली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार नाटे बाजारपेठ येथे विनापरवाना मटका जुगार सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या आधारे पोलिसांनी जुगारावर कारवाई केली. या कारवाई १ हजार ९१५ रुपये जप्त केले. या प्रकरणी पोलिसांनी नाटे पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.