शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतविण्यास सांगून २१ लाखाची फसवणूक

रत्नागिरी:- शेअर मार्केटमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांचे शेअर्स वाढणार आहेत असे भासवून; तसेच जास्त नफ्याचे अमिष दाखवून गुंतवणूकीस भाग पाडून, २१ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या संशयिताविरुद्ध जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हर्ष वर्मा (पुर्ण नाव पत्ता माहित नाही) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना २३ मे ते २२ जुलै २०२४ या कालवधीत घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सोम्या कान्ति नियोगी (रा. जेएसडब्ल्यू टाऊनशीप झोन-२ चाफेरी विनायकवाडी, रत्नागिरी) यांच्या मोबाईलमध्ये मार्केट मास्टर हब जीओ-१ या व्हॉटअॅप ग्रुपला जाईंट करुन ग्रुपचे अॅडमीन संशयित हर्ष वर्मा यांनी एका मोबाईल क्रमांकावर साईट तयार करुन त्यामध्ये फिर्यादी यांचे अकाऊंट तयार करुन ती लिंक फिर्यादी यांना पाठवून ती ओपन करण्यास सांगून व्हॉटसअप ग्रुपवर वेगवेगळ्या कंपन्यांचे शेअर्स ५ टक्के व १० टक्के वाढणार आहेत. असे भासवून तसेच कमी वेळात जास्त नफ्याचे अमिष दाखवून फिर्यादी यांना पैसे गुंतविण्यास सांगून २१ लाख रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी सोम्या नियोगी यांनी जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास जयगड पोलिस अमंलदार करत आहेत.