रत्नागिरी:- रत्नागिरीतील एक नामवंत हॉस्पिटल कोरोना बाधित रुग्ण सापडल्याने सील केले असताना आणखी एका खाजगी रुग्णालयात कोरोनाने शिरकाव केला आहे. येथील एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. काही दिवसांपूर्वी एक कोरोना बाधित पोलीस कर्मचारी या हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी आल्यानंतर या खाजगी रुग्णालयातील कर्मचारी क्वारंटाईन करण्यात आले होते.
दरम्यान रत्नागिरी तालुक्यात सातत्याने कोरोनाबाधित रुग्ण सापडून येत आहेत. कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार पुरवणाऱ्या कोव्हिड रुग्णालयातील भुलतज्ञ आणि एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. गुरुवारी रात्री या दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. याशिवाय गणपतीपुळे येथे 2, राजीवडा, एमआयडीसी, ओसवाल नगर, कसोप यासह काही दिवसांपूर्वी सील केलेल्या खाजगी रुग्णालयातील पाचपेक्षा अधिक कर्मचारी कोरोना बाधित आढळून आले आहेत.