रत्नागिरी:- शहरातील जयस्तंभ ते घुडेवठार जाणाऱ्या रस्त्यावर एका झाडाखाली मटका जुगारावर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाई साहित्यासह ५२० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. शहर पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रसाद राजेंद्र साळवी (वय ३४) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. २४) पावणे सहाच्या सुमारास निदर्शनास आली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित विनापरवाना कल्याण मटका जुगार चालवत असताना सापडला. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल अमित पालवे यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.









