तुतारी एक्स्प्रेसमधून कागदपत्रांची चोरी करत खात्यातील एक लाख लांबवले

देवरूख:- तुतारी एक्सप्रेसमधून पर्स, मोबाईलसह कागदपत्रे चोरून त्याआधारे खात्यातील एक लाख रुपये लांबविल्याप्रकरणी संगमेश्वर पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोकण रेल्वे मार्गावरील तुतारी एक्सप्रेसमधून प्रिया ज्ञानेश्वर संकपाळ (वय 58,रा. वैभववाडी) या दि.25 जून रोजी दादरहून सावंतवाडी येथे जात होत्या. प्रवासादरम्यान त्यांच्या ताब्यातील पर्स अज्ञात चोरट्याने लांबवली. त्यामध्ये 1940 रु. रोख, मोबाईल, काळा चष्मा व कागदपत्रे अशा ऐवजाचा समावेश होता. चोरट्याने पर्समधील कागदपत्रातील सहाय्याने प्रिया संपकाळ यांच्या बँक खात्यावरील एक लाख रुपये लांबविले हे श्रीमती संकपाळ यांच्या लक्षात येताच त्यांनी संगमेश्वर पोलीस स्थानकात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.