रत्नागिरी:- सोन्याचा मुलामा दिलेले बनावट दागिने गहाण ठेवून कर्ज घेणाऱ्या टोळीने रत्नागिरी शहरातील श्री समर्थ भांडारी नागरी सहकारी पतसंस्थेसह कोल्हापुरातील एका बँकेच्या रत्नागिरी शाखेलाचीही फसवणूक केली आहे.
भंडारी नागरी सहकारी पतसंस्थेच्या तक्रारीवरून योगेश पांडुरंग सुर्वे रा. कुवेशी याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला बुधवारी रात्री अटक करण्यात आली आहे. तर अन्य एका बँकेच्या शाखेची तक्रार आज गुरुवारी दाखल होण्याची शक्यता आहे.
योगेश पांडुरंग सुर्वेयाने श्री समर्थ भांडारी नागरी सहकारी पतसंस्थत दि. १४ जानेवारी २०२३ रोजी ५४ ग्रॅम वजनाच्या दोन चेन ठेवून १ लाख ८५ हजार व ३७ हजार रु. असे एकूण २ लाख २२ हजार ५०० रु.चे कर्ज घेतले होते. श्री समर्थ भांडारी नागरी सहकारी पतसंस्थेच्या लक्षात आल्यानंतर किशोर खताते यांनी दिलेल्या तक्रारी वरून शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.