रत्नागिरी:- रविवारी सायंकाळी रत्नागिरी शहरासह तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाने ढगांच्या गडगडाट हजेरी लावली. शहरी भागात पावसाच्या किरकोळ सरी बरसल्या. मात्र, ग्रामीण भागात पावसाच्या जोरदार सरींनी हजेरी लावली.
रत्नागिरीत मागील काही दिवसांपासून उकाड्यात प्रचंड प्रमाणात वाढ झाली होती. हवेतील आद्रता वाढल्याने रत्नागिरीकरांची गरम्याने अक्षरशः लाहीलाही झाली. अशातच हवामान विभागाने मॉन्सून पूर्व पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज व्यक्त केला होता.
रविवारी पहाटे पावसाच्या किरकोळ सरींनी रत्नागिरी शहर आणि परिसरात हजेरी लावली. किरकोळ सरी कोसळल्या नंतर पुन्हा उकाड्यात वाढ झाली होती. रविवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास अचानक आभाळ काळया ढगांनी दाटून आले. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. रत्नागिरी शहर परिसरात किरकोळ सरींनी हजेरी लावली. मात्र ग्रामीण भागात अनेक ठिकाणी जोरदार सरी बरसल्या. पावसाच्या हजेरीने रत्नागिरीकरांची उकाड्यापासून