रत्नागिरी:- तालुक्यातील पाली येथील विवाहितेचे अश्लिल व्हिडिओ बनवून ते सोशल मिडीयावर प्रसारित करण्याची धमकी देत तिच्याकडून पैशांची मागणी करणार्या संशयिताला ग्रामीण पोलिसांनी गुरुवारी रात्री 10 वा. अटक केली. शुकवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याची रवानगी सोमवार पर्यंत पोलिस कोठडीत केली.
कौस्तुभ आदिनाथ वेल्हाळ (27,रा.पाली बाजारपेठे, रत्नागिरी) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात पिडीतेने दिलेल्या तक्रारीनुसार, सन 2014 ते 2019 या कालावधीत संशयित कौस्तुभने पिडितेशी जबरदस्ती शारिरीक संबंध प्रस्थापित करुन त्याचे व्हिडिओ तयार केले. त्यानंतर तेच व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याकडे पैसे उकळले. त्याच्या या सततच्या त्रासाला कंटाळून पिडिता पाली येथून पुन्हा मुंबईला निघून गेली. तिथेही तिच्याशी संपर्क साधून संशयित तिला शिवीगाळ करुन पैशांची मागणी करु लागल्यावर पिडितेने अखेर अर्नाळा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरोधात भादंवि कायदा कलम 376, 376(2)(एन), 500, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल केला.त्यानंतर तो गुन्हा ऑनलाईन कार्यप्रणाली व्दारे ग्रामीण पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला. ग्रामीण पोलिसांनी गुरुवारी कौस्तुभला अटक करुन शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची सोमवार पर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली.









