खेड:- मिटींग चालू असताना सरपंच, उपसरपंच तसेच ग्रामसेवकांच्या अंगावर धावत जाऊन ग्रामसेवक व उपसरपंच यांना सुनील कुमार राजाराम शिंदे व राजेंद्र यशवंत भिलारे (राहणार भिलारे) यांनी धक्काबुक्की केली. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात राहुल राजेंद्र चौधरी ग्रामसेवक यांनी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी न्यायालयाने सुनील शिंदे व राजेंद्र भिलारे यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
खेड पोलिसांनी केलेल्या आरोपानुसार 4 मार्च 24 रोजी मीटिंग चालू असताना सुनील शिंदे व राजेंद्र भिलारे सरपंच उपसरपंच फिर्यादी यांच्याशी वाद केला. शिवाय ग्रामसेवक राजेंद्र चौधारी यांच्या अंगावर धावत जाऊन उपसरपंच शिवाजी भिरवटकर यांना धक्काबुक्की केली व शासकीय कामात अडथळा निर्माण केला. म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला होता. या कामी सुनील शिंदे व राजेंद्र भिलारे यांनी अटकपूर्व जाणून मिळण्याकरता ॲड. सुधीर बुटाला व ॲड. समीर शेठ यांनी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला होता प्रसंगी या दोघांनी न्यायालयात केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा न्यायाधीश यांनी संशयिताच तुर्त स्वरूपात अटकपूर्व जामीन काही अटींवर मंजूर केला.









