रत्नागिरी:- विमानाचे तिकिट बुक करताना अज्ञाताने बनावट वेबसाईटच्या आधारे फियार्दीची 46 हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली. ही घटना 15 जानेवारी 2023 रोजी रात्री 8.51 ते 13 फेब्रुवारी रोजी 9.58 वा. कालावधीत शिवाजीनगर येथे घडली आहे.
याबाबत विनय विष्णू देवरुखकर (रा. भोसले प्लाझा शिवाजीनगर, रत्नागिरी) यांनी एक महिन्यानंतर 12 मार्च रोजी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, 15 जानेवारी 2023 ते 13 फेब्रुवारी 2024 या कालावधीत विनय देवरुखकर आपल्या घरातील लॅपटॉपवरुन इंडिगो कंपनीमार्फत गोवा ते हैद्राबाद असे जाण्याचे व परतीचे तिकिट बुक करत होते. त्यावेळी अज्ञाताने ‘वाराफी डॉट कॉम’ ही बनावट वेबसाईट बनववून त्याच्या आधारे फिर्यादीकडून तिकिटााचे 45 हजार 800 रुपये क्रेडिट कार्डव्दारे ऑनलाईन पध्दतीने स्विकारुन फसवणूक केली. आपली फसवणूक केल्याचे लक्षात येताच त्यांनी शहर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. तक्रारीवरुन अज्ञाताविरोधात भादंवि कायदा कलम 420 माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 कलम 66 (ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.