रत्नागिरी:- रत्नागिरीत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने पुन्हा एकदा अमली पदार्थ विरोधी धडक कारवाई केली. शहरतील शिवखोल येथे ही कारवाई झाली असून 80 हजाराचा मुद्देमाल जप्त केला.
महम्मद जैनुद्दीन वस्ता (वय 42) असे संशयिताचे नाव आहे .या कारवाईत 4 ग्रॅम ब्राऊन शुगर, 11 ग्रॅम गांजा आणि रोख रक्कम असा 80 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
रत्नागिरी शहरात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून अंमली पदार्थ सेवन करणारे, विक्री करणारे यांच्यावर नजर ठेऊन आहे. कोणी मिळाल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक आकाश साळुंखे यांनी केले आहे. ही कारवाई आकाश साळुंखे यांच्या नेतृत्वाखालीआकाश साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार सागर साळवी, विजय आंबेकर, पोलीस नाईक योगेश नार्वेकर, चालक दत्ता कांबळी या टीमने केली. सलग दोन दिवस करण्यात आलेल्या कारवाईमुळे अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.