तरुणीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन; रिक्षा चालकाविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- रिक्षा चालकाने प्रवासी तरुणीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केली. संशयित रिक्षा चालकाला पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. अब्दूल रहेमान दिलावर मुजावर (वय ३९, रा. मिरज. सध्या राजिवडा पुलाखाली, रत्नागिरी) असे संशयित चालकाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. १) ला दुपारी सव्वाच्या सुमारास शहरातील जेल रोड येथे घडली होती.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी दुपारी पिडीता तिच्या मैत्रिणीसह गोडबोले स्टॉप ते जेलरोड असे संशयिताच्या शेअर रिक्षाने जात असताना चालकाने प्रवासी तरुणीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. या प्रकरणी तरुणीने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांच्या डीबी पथकाने संशयित रिक्षा चालाकास अटक केली. न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.