पैशाची गरज असताना घेतले होते दागिने; गुन्हा दाखल
संगमेश्वर:- पैशांची गरज असताना नातेवाईकाकडून पैशाकरता घेतलेले दोन लाख 60 हजार रुपये किमतीचे दागिने परत न दिल्याने संगमेश्वर पोलीस ठाण्यात नातेवाईकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदरची घटना कोंडीवरे कातळ मोहल्ला येथे घडली.
नसिम जहांगीर काझी, वय 54 व्यवसाय गृहिणी, रु. कातळ मोहल्ला, कोंडिवरे यांनी त्यांचे नातेवाईक रुही साबीर कापडी रा कातळ मोहल्ला, कोंडिवरे, यांच्याकडे 2 लाख 60 हजार रुपये किंमतीचे दागिने विश्वासाने दि 2020 ते 10 जानेवारी 2024 या मुदतीत दिले होते. याठिकाणी त्यांचे साडेआठ तोळ्याचे दागिने रु95000 काळ्या आणि पिवळ्या मणी आणि चौकोनी लटकन असलेला 26 ग्रॅम वजनाचा नेकलेस, 95000 /- रु. किंमतीचे एक मंगळसूत्र 26 ग्रॅम वजनाचे काळे व पिवळे मणी व असलेले चौकोनी पेंडन्ट असलेले जु.बा. किं. सु. १२०००/- रु. 3 ग्रॅम 12000/- रु. किंमतीचे एक 3 ग्रॅम वजनाचा एल आकाराचा कान टॉप जोड जु.वा.किं.सु.20000/- रु. 5 ग्रॅम वजनाच्या पेंडंट- आकाराच्या कानाच्या टॉप्सच्या जोडीची किंमत आहे १२०००/- रु. 3 ग्रॅम पिल्लू पिवळसर धातूची साखळी ६०००/- रु. 1.5 ग्रॅम किमतीची महिला अंगठी अशी एकूण सुमारे 2 लाख 60 हजार रुपयांचे किमतीचे दागिने बॅंकेत गहाण ठेवण्यासाठी दिलेले होते.
परंतू सदरचे दागिने आज पर्यत त्यांना परत दिलेले नाहीत त्यांचा विश्वासघात करून दागिने घेवून फसवणूक केलेली आहे. नसीम जहांगीर काझी यांना आपले फसवणूक झाल्याची समजल्यानंतर त्यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास संगमेश्वर पोलीस निरीक्षक सुरेश गावित यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.